Breaking News

देडगावमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट


नेवासा तालुक्यातील व्यंकटेश उर्फ बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे. देडगाव हे गाव जवळपास 10 ते 12 हजार लोकसंखेच्या गाव आहे. या गावांमध्ये बाहेरगावाहून देवदर्शनासाठी नेहमी भाविक येतात. त्यामुळे देडगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचयातला वेळोवेळी ठराव मागून देडगाव मधील अवैध धंदे बंद करण्यासाठी नेवासा पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे .

परंतु पोलीस निरीक्षक यांनी या ठरावाचा विचार न करता या ठरावाला केराची टोपली दाखवली यामुळे देशी विदेशी दारू देखील भाजीमंडीतून वाहतूक सुरु असल्याचे दिसून येत आहे. परंतु देडगाव पासून जवळ असलेले कुकाना पोलीस दुरक्षेत्र हे याकडेे डोळेझाक करीत आहे असे दिसून येत आहे. त्यामुळे आता तरी पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा याकडे लक्ष देणार आहे की नाही याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.