Breaking News

नाथ व वारकरी संप्रदायाची शिकवण प्रेरणादायी - डॉ. क्षितीज घुले.


भाविनीमगाव,  शेवगाव तालुक्याभोवतालची नेवासा, पैठण तालुक्याची भुमी संतांच्या तर पाथर्डी तालुका नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी असुन शेवगाव तालुक्यातील अनेक जागृत देवस्थान नागरिकांची श्रद्धास्थाने आहेत. येथील नाथसंप्रादाय व वारकरी संप्रदाय महाराष्ट्राला चैतन्य, स्फूर्ती, आदर्श व प्रेरणादायी असुन संताच्या शिकवणीणे या भूमीतील लोक शांतता, सामंजस्यता अंगी बाळगुन गुण्यागोविंदाने नांदत असल्याने एक आदर्शवत समाज या भुमीत असल्याने एक प्रेरणादायी सहवास लाभला असल्याचे प्रतिपादन शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील वरखेड येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास सदिच्छा भेटी दरम्यान उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. येथील सप्ताहाचे हे 40 वे वर्षे असल्याने या अखंड हरीनाम साप्ताहाचे भव्य स्वरूपात गावकर्‍यांनी आयोजन केले आहे. पाथर्डी तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री. तारकेश्‍वर गडाचे नारायण महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते सुरू झालेल्या या सप्ताहाच्या सहाव्या दिवशी शेकटे महाराजांच्या कीर्तनाच्या श्रवणाचा लाभ घेतल्यानंतर घुले भाविकांन समोर बोलताना म्हणाले की तालुक्याच्या चारही दिशेला मोहटादेवी ,वृद्धेश्‍वर , मढी , भगवान गड, तारकेश्‍वरगड, आव्हाने , भावी निमगाव, नेवासा, पैठण, मळेगाव यासारख्या जागृत तीर्थक्षेत्राची भूमी आहे . 

लाखो भक्त गण या तिर्थक्षेत्रांना भेट देतात . तिर्थक्षेत्राच्या भेटीने एक मानसिक समाधान मिळून अंगी चैतन्य व प्रेरणा निर्माण होते . संत नारायण बाबांनी या भागाला सरळ भक्तीचा मार्ग दाखवून सर्वसामान्यांची सेवा करण्याचा संदेश दिला . तोच वारसा या गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री उत्तम प्रकारे चालवतात . या भागातील अनिल महाराज वाळके वारकरी संप्रदायामध्ये एक आदर्शवत व्यक्तिमत्व असून , ते आपल्या अखंड सेवेतून परमार्थ व प्रपंच यांची सांगड घालून आदर्श जीवन जगण्याचे महत्व आपल्या सुमधुर वाणीतून सातत्याने देत असतात.असे गौरवोद्गार संताप्रती घुले यांनी काढले. या प्रसंगी ज्ञानेश्‍वर उद्योग समूहाच्या वतीने डॉ. क्षितिज घुले यांच्या हस्ते महंत आदिनाथ महाराज शास्त्री, अनिल महाराज वाळके , शेकटकर महाराज यांचा यथोचित सन्मान करण्यात आला . त्याच बरोबर सप्ताहाचे आयोजक व सेवेकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून तेलोरे गुरुजी यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला . यावेळी सरपंच हनुमान पातकळ, पं. समिती उपसभापती शिवाजीराव नेमाने, बाबासाहेब काळे, रेवणनाथ शिरसाठ, मनोज शिरसाठ आदीसह या सप्ताहास 10 ते 12 हजार भक्तगणांचा जनसमुदायउपस्थित होता.