Breaking News

श्री क्षेत्र काळेश्‍वर -गुंफा येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात



श्री क्षेत्र काळेश्‍वर -गुंफा येथील दक्षिणमुखी हनुमान देवालयात हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. शेवगांव - नेवासा राजमार्गावरील स्वयंभू काळेश्‍वर देवस्थान श्री क्षेत्र गुंफा येथील जागृत असलेले श्री दक्षिणमुखी बजरंगबली या देवतेचा जन्मोत्सवावेळी संतोष महाराज ठेणगे यांच्यासह परिसर व गावातील भजनी मंडळी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरीनामाच्या जयघोषाने व श्री दत्तात्रय देवा गोसावी व श्री ञिंबक देवा गोसावी यांच्या हस्ते विधीवत पुजा व गंगा जलाने महाभिषेक करण्यात आला. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला.