Breaking News

मुलुंडमध्ये यंदाचे ’अखिल भारतीय नाट्य संमेलन’

मुंबई - अखिल भारतीय नाट्य परिषदेचे 98 वे संमेलन मुलुंडला भरविण्यात येणार आहे. मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात 13 ते 15 जून दरम्यान हे तीन दिवसीय नाट्य संमेलन चालणार आहे. रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार या संमेलनाच्या अध्यक्ष असणार आहेत.

यावर्षी नाट्य परिषदेच्या निवडणुका झाल्यामुळे संमेलनाला उशीर झाला आहे. मुंबईत नाट्य संमेलन घेण्यात येणार असल्याची घोषणा यापूर्वीच नाट्य परिषदेने केली होती. मात्र, मुंबईत नेमके कुठे हे नाट्य संमेलन आयोजित केले जाणार, याबाबत नाट्यप्रेमींना उत्सुकता लागली होती. नाट्य परिषदेच्या मुलुंड शाखेकडून मुलुंड येथे नाट्य संमेलन भर विण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने मंजूर केला
25 वर्षांच्या दिर्घ कालावधीनंतर मुंबईत नाट्य संमेलन होत आहे. या संमेलानासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. कालिदास नाट्यगृहातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकु लात या संमेलनातील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.