दखल - वा रे मुख्यमंत्री आणि मंत्री!
त्रिपुरात गेल्या 25 वर्षांनंतर सत्तांतर घडविण्यात भाजपला यश आलं असलं, तरी सध्याचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव रोज जी बाष्कळ बडबड करतात, ती पाहिली, तर त्रिपुराच्या जनतेला आपण कुणाच्या हाती सत्ता दिली, असं वाटलं, तर आश्चर्य वाटायला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नेत्यांना वायफळ बडबड करू नक ा, असा सल्ला दिला असला, तरी ते ऐकायला तयार नाहीत. त्याचं कारणही तसंच आहे. आपल्या वागणुकीतून इतरांपुढं आदर्श ठेवायचा असतो, याचं भान शहा-मोदींना नसल्यामुळं त्यांचा सल्लाही कुणी गांभीर्यानं घेत नसावं.
मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियासारख्या अनेक योजना आणूनही प्रत्यक्षात बेरोजगारीचं प्रमाण खूपच वाढलं आहे. नोटाबंदीनं त्यात भर घातली. असं असताना मोदी-शहा यांना जेव्हा वाढत्या बेरोजगारीबाबत प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी रोजगारवृद्धी झाल्याचं खोटंच सांगितलं. सरकारी आक डेवारी वेगळीच आहे. पकोडे तळून विकणार्यामुळंही बेरोजगारी कमी होते, असा जावईशोध त्यांनी लावला. त्यावर भरपूर टीका झाली. उच्चशिक्षण घेतलेल्या युवकांना भजीच तळायला लावायची होती, तर त्यासाठी त्यांना शिक्षण तरी कशाला घ्यायला लावायचं, त्यांच्या शिक्षणावर एवढा खर्च कशासाठी करायला लावायचा, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. शहा-मोदी यांच्या प्रभावळीतून अन्य नेते तरी मागं कसे राहतील? त्यातही त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांना प्रभारी सुनील देवधर यांनी राजकारणात आणून त्यांच्याकडं राज्याची धुरा सोपविली. त्या देवधरांनाही आता आपली निवड चुकली की काय असं वाटू लागेल. देव सध्या रोज चित्रविचित्र शेरेबाजी करीत असल्यामुळं मसोशल मी डियाफवर त्यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे.
आता त्यांनी देशातील युवकांना अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे! युवकांनी नोकरी करण्याऐवजी पान दुकान सुरू करा असा त्यांचा सल्ला आहे. युवकांनी सरकारी नोकरीसाठी राजकीय नेत्यांच्या मागं जाऊ नये, असं त्यांचं म्हणणं योग्य आहे. परतुं, युवकांनी पानाचं दुकान सुरू करावं, पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत बँकेकडून कर्ज घेऊन पशुपालन क्षेत्रातील विविध योजना सुरू करून स्वयंरोजगार सुरू करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील युवकांना नोकरी करण्याऐवजी भजी विकण्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर विरोधी पक्षांनी याप्रकरणी पंतप्रधान आणि भाजपाविरोधात आंदोलनं केली होती. विप्लव देव म्हणाले, की युवक अनेक वर्षे सरकारी नोकरीसाठी राजकीय नेत्यांच्या मागं लागलेले असतात. आपल्या आयुष्यातील महत्वाचा वेळ सरकारी नोकरीच्या शोधात वाया घातला जातो. जर त्याच युवकाने नेत्यांच्या मागं धावण्यापेक्षा जर पानाचं दुकान सुरू केलं, तर त्याच्या बँक खात्यात 5 लाख रूपये जमा झाले असते. गायी पाळण्याचा व्यवसाय केला असता, तरी त्यांच्या खात्यात पाच लाख रुपये जमा झाले असते, असं त्यांनी म्हटलं. आता पाच लाख रुपयेच का अशी शंका कुणी घेऊ नये. तत्पूर्वी त्यांनी नागरी सेवा क्षेत्रासाठी मेकॅनिकल इंजिनियरपेक्षा सिव्हिल इंजि नियर जास्त योग्य आहेत. जे प्रशासनात आहेत त्यांना समाज बांधायचा असतो. सिव्हिल इंजिनियर्सना याचं उत्तम ज्ञान असतं. त्यामुळं ज्यांची मेकॅनिकल इंजिनियरींगची पार्श्वभूमी आहे, त्यांनी नागरी सेवा क्षेत्रात जाऊ नये, असं अजब विधान केलं होतं. ज्याच्यात आपल्याला गती नाही, त्याच्यात आपण लक्ष घालू नये, असा साधा नियम आहे. परंतु, वाचाळवीरांना ते कोण सांगणार? सिव्हिल इंजिनियर नागरी सेवा क्षेत्रात बांधकाम प्रकल्पांमधून योगदान देऊ शकतात; पण मेकॅनिकल इंजिनियर्सना हे जमणार नाही असं देब म्हणाले. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आगरतला येथे हातमाग कलाकाराच्या कार्यक्रमात बोलताना बिप्लब देब यांनी सौंदर्याचा विषय काढला व मिस वर्ल्डचा किताब जिंकणार्या ऐश्वर्या राय आणि डायना हेडनची तुलना केली. भारताचं खरं सौंदर्य ऐश्वर्या रायमध्ये आहे. डायना हेडन भारतीय सौंदर्याचं प्रतिनिधीत्व करत नाही. देवी लक्ष्मी, सरस्वती सौंदर्याचं उत्तम उदहारण असून भारतीय सौंदर्य तसं असलं पाहिजे. सलग पाच वर्ष ममिस वर्ल्ड’, मिस युनिव्हर्स’ चा किताब भारताला मिळत होता. जो कोणी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा त्याला हा किताब मिळायचा. डायना हेडनलाही तसाच किताब मिळाला. डायना हेडन या किताबासाठी योग्य होती असं तुम्हाला वाटतं का ? लोक म्हणतील बिप्लब देब वाद उत्पन्न करतोय. ऐश्वर्याला रायला हा किताब मिळाला, कारण तिच्यामध्ये भारतीय सौंदर्याचे ते सर्व गुण आहेत असं बिप्लब देब म्हणाले होते. भारतीय महिला कॉस्मेटिक किंवा शॅम्पू वापरत नाहीत. केस गळू नये, यासाठी मेथीच्या पाण्याने आपण केस धुतो. सौंदर्य स्पर्धा आयोजित करणारे हे आंतरराष्ट्रीय मार्केटिंग माफिया आहेत. असे किताब देऊन ते 125 क ोटी भारतीय लोकसंख्येची बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न करतात, असं अजब तर्कशास्त्रही त्यांनी मांडलं होतं.
मोदी यांनी मंत्री, आमदार, खासदारांना मसाला पुरवू नका, तोंडाला लगाम घाला, असं सांगून काही तास होत नाहीत, तोच मंत्री, आमदार, खासदार माध्यमांना मसाला पुरवायला लागले आहेत. उत्तर प्रदेशात अशा नेत्यांचं पीक जरा जास्तच आहे. इतरांपेक्षा राजपूत आणि यादव जास्त दारु पितात असं वादग्रस्त विधान करणार्या उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या निवासस्थानावर शनिवारी आंदोलकांनी टोमॅटो आणि अंडी फेकून मारली. समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते राजभर यांच्या हजरतगंज येथील अधिकृत निवासस्थानी धडकले. त्यांनी राजभर यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन दरवाजावरच्या नावाच्या पाटीचं नुकसान केलं. दारु पिण्याच्या सवयीवर बोलताना शुक्रवारी राजभर यांनी वाराणसीमध्ये हे वक्तव्य केलं होतं. दारु पिण्याच्या बाबतीत राजभर समाजाच्या लोकांना सर्वाधिक दोष दिला जातो; पण सर्वाधिक दारु राजपूत आणि यादवच पितात असं विधान ओम प्रकाश राजभर यांनी केलं होतं. यादव आणि राजपूतांना दोष देतानाच त्यांनी आपल्या स्वत:च्या राजभर तसेच अन्य जातीचे लोकही दारु पितात, असं मान्य केलं होतं.
दारु पिऊन आल्यावर काय त्रास होतो हे तुम्हाला आई, बहिण किंवा पत्नीच सांगू शकते, असं राजभर म्हणाले होते. ओम प्रकाश राजभर हे भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय पार्टीच्या कोटयातून मंत्री झाले आहेत. याआधी योगी आदित्यनाथ सरकारच्या कामगिरीवरुनही त्यांनी वाद निर्माण केला आहे. राज्यातील भाजप सरकारनं एकही चांगलं काम केलेलं नाही, असं विधान त्यांनी दोन दिवसांपूर्वीच केलं होतं. काँग्रेस सरकारला कंटाळून जनतेनं ज्याप्रकारे पर्याय म्हणून मोदींना निवडलं, त्याचप्रमाणं उत्तर प्रदेशमधील जनता पर्याय शोधेल, असं ओम प्रकाश राजभर म्हणाले होेते. त्यावरूनही वाद झाला होता.