काँग्रेसने रडीचा डाव खेळू नये : शरद पवार
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसची विरोधाला विरोधाची भूमिका नसून सहकार्याची भूमिका आहे. आमचे काँग्रेसला सहकार्य राहील. त्यांनी जे काय आहे ते थेट करावे, मात्र रडीचा डाव खेळू नये, अशी स्पष्ट भूमिका घेत शरद पवार यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.
राज्यात यवतमाळ, सांगली, लातूर, उस्मानाबाद अशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला असताना काँग्रेसने वेगळी खेळी केली. लातूरला तर काँग्रेसच्या नेतृत्वाच्या सांगण्यावरून आम्ही विधानसभा, लोकसभेची जागा सोडली. पण, काँग्रेसने सातत्याने विसंवादाची भूमिका घेतली. त्याचा फटका दोन्ही पक्षाला मागील निवडणुकीत बसला आहे. त्यामुळे आता याबाबत गंभीर भूमिकेची वेळ आली असून, त्यांनी जे काय आहे ते थेट करावे रडीचा डाव खेळू नये, अशा शब्दात पवार यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतले.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाची निवडणूक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पवार बोलत होते. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नवीन प्रदेशाध्यक्ष पदावर नेमकी कोणाची वर्णी लागेल याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. जयंत पाटील यांचे नाव त्यामध्ये आघाडीवर होते. अखेर आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यावेळी राज्यभरातून पदाधिकारी मोठ्या संख्येने आले होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा आता बुथ लेवलला काम करेल. पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहचविण्यसाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. तसेच, तरुणपिढीला पक्षात वाव दिला जाईल, असेही पाटील म्हणाले.