तलाठी आडोळे यांना निलंबित करा : ‘छावा’ची मागणी
राहुरी प्रतिनिधी - येथील उर्मट तलाठी आडोळे हे नेहमीच तलाठी कार्यालयामध्ये उपस्थित नसतात. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या उर्मटपणाविषयी प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी अर्थात सोमवारी {दि.०२.} सकाळी ११.१५ च्या दरम्यान तलाठी कार्यालयाबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे अ. भा. छावा संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील यांनी नागरिकांना विचारपूस केली. तलाठी साहेबांची प्रतीक्षा सुरु असल्याचे समजले. कार्यालयीन वेळ होऊनदेखील तलाठी कार्यालयात न आल्याने त्यांना ‘ कार्यालयात कधी येणार?’ असे विचारण्यासाठी लांबे यांनी तलाठी आडोळे यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी ‘मी भरणा करण्यासाठी बँकेत गेलो होतो’ असे सांगण्यात आले. परंतु आज {दि. ०२ } सर्व बँकांना सुट्टी असूनदेखील सबंधित तलाठी ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणे त्यांचे काम सुरु आहे. सदर तलाठी हा राहुरीमध्ये शासकीय सेवेत आल्यापासून वाळू तस्करांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासून भरपूर ‘माया’ गोळा केलेली आहे. तरी या तलाठ्याचा संपत्तीची देखील चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
लांबे पा. यांनी तहसिलदार दौंडे यांच्याशी संपर्क करून सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला आहे. तहसिलदार यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. सदर तलाठ्याच्या उर्मट वागणुकीच्या विरोधात कारवाई न झाल्यास अ. भा. छावा मराठा संघटना व इतर समविचारी संघटनांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा देवेंद्र लांबे पाटील यांनी दिला आहे.