Breaking News

कृषी जैवतंत्रज्ञानचा अनोखा ‘एप्रिल कुल’

प्रवरानगर - जलस्त्रोतांचे साठे हे उन्हाळ्यात कमी होत चालले आहेत. जलस्रोतांचे संवर्धन व्हावे आणि झाडे हे जास्त दिवस टिकावी, यासाठी अनोखा ‘एप्रिल कुल’ हा उप्रक्रम हाती घेण्यात आला. 

येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी पालापाचोळ्याचे मल्चिंग करणे जेणेकरून झाडे जास्त दिवस टिकतील आणि उन्हाळ्यात पक्षासाठी झाडावर पाणी ठेवून पक्ष्यांची तहान भागेल, यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत हा उपक्रम पार पडला. 

राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम करण्यात आला. यावेळी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, रासेयोचे समन्वयक प्रवीण गायकर, प्रा. महेश चेंद्रे, प्रा. अमोल सावंत, कांबळे, डांगे, राहणे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी स्वयंसेवक प्रतीक्षा अभंग, मैथिली जाधव, झान्सी पट्टीपाती, चिंता श्रीहर्षा, यश मखर, विनायक चव्हाण, शुभम शिंदे आदींनी परिश्रम घेतले.