Breaking News

भारिप बहुजन महासंघाची बैठकीत गाव तेथे शाखा सुरु करण्याचा ठराव


भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणी बैठक संगमनेर येथे जिल्हाध्यक्ष शऱद थोरात यांच्या उपस्थितीत व जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत गेल्या काही दिवसात भीमा कोरेगाव प्रकरणावरुन जेष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर शाब्दिक चिखलफेक करणाऱ्या इतर दलित संघटनांचा खरपूस समाचार घेण्यात आला. आपल्या नेत्यांचा विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मगरळ दूर करुन, सर्वांनी कंबर कसून कामाला लागण्याचा संदेश देतांना, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी गाव तेथे भारिप बहुजन महासंघाची शाखा स्थापन करणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी संजय भालेराव, भाऊसाहेब जी. गायकवाड, सोमनाथ खरात, सिध्दार्थ दारोळे, राहुल रोकडे, रवि दिवे, बाळासाहेब क्षीरसागर, छबु सोनवणे, अक्षय भालेराव, गणेश पवार, विलास कदम, संजय गायकवाड, नानु सैंदाणे, सुभाष खरात, रावसाहेब पराड, एकनाथ मेढे, अशोक गायकवाड, महिला आघाडीच्या सुशिला जगताप, सुषमा सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.