Breaking News

मृदूला सातपुते, जय जाधव यांना रौप्य पदक

रोहतक हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या 24 व्या राष्ट्रीय थांगता मार्शल आर्ट्स स्पर्धेत जामखेडचे ल. ना होशिंग विद्यायलायची खेळाडू मृदुला मुकुंदराज सातपुते व नागेश विदयलायचा खेळाडू जय नितीन जाधव यांनी रौप्य पदक मिळविले.

या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आयडियल स्पोर्टस् अकादमीच्या जामखेडच्या 8 खळाडूंची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली होती. या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच प्रा. लक्ष्मण उदमले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, तालुका क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, जामखेड पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, जि. प सदस्य सोमनाथ पाचरणे, प्रा. मधुकर राळेभात, केंद्र प्रमुख मुकुंदराज सातपुते, ल. ना होशिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक खेत्रे, नागेश विदयालयाचे मुख्याध्यापक काळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.