Breaking News

राहुल गांधी समाजात द्वेष पसरवत आहेत : शाह

नवी दिल्ली -  काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज केला आहे. ते राहुल गांधी यांच्या अ‍ॅट्रॉसिटी क ायद्याबाबतच्या विधानावर बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी खोटे बोलत असल्याचाही आरोप केला.शाह हे सध्या ओडिशाच्या दौर्‍यावर असून त्यांनी ट्विटरवर राहुल गांधी यांच्या भाषणाचा काही भाग असलेला व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात राहुल गांधी एका भाषणात म्हणत आहेत, ’दलित आणि आदिवासींच्या विरोधातील अत्याचार वाढत आहेत आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदादेखील मागे घेतला जात आहे.