Breaking News

आसारामचा आज फैसला जोधपूरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात


जोधपूर : लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूच्या शिक्षेवर बुधवारी जोधपूर न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापार्श्‍वभूमीवर अनुचित प्रकार घडून नये म्हणून जोधपूरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एवढेच नाही तर शहरात कलम 144 देखील लागू करण्यता आले आहे. निकालाच्या दिवसासाठी आम्ही पूर्णपणे व्यवस्था केली आहे. न्यायालयीन कर्मचार्‍यांपासून ते न्यायमूर्तींपर्यंत आसाराम आणि सह आरोपींची सुरक्षितता आणि फिर्यादी पक्षाचे वकील न्यायालयात उपस्थित राहतील, असे कारागृहाचे डीआयजी विक्रम सिंह यांनी सांगितले आहे. आसाराम बापू प्रकरणाचा आज बुधवारी निकाल असल्याने कोणताही हिंसाचार होऊ नये म्हणून पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवला आहे. जोधपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. गर्दी दिसताच कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.