Breaking News

महिलांनी ओढला विजयरथ


संगमनेर : ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरोधात विरोधात येथील महिलांनी सुमारे गेल्या शंभर वर्षांपूर्वी हनुमानजयंती निमित्त सुरु केलेली मारुतीचा रथ ओढण्याची परंपरा आजही कायम ठेवली. आज {दि. ३१} संगमनेर शहरासह तालुक्यात हनुमान जयंतीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरातील मोठा मारुती मंदिर, तट्ट्या मारुती मंदिर आरगडे गल्ली येथील मारुती मंदिर, पंचमुखी मारुती, दक्षिणमुखी मारुती मंदिरात भक्तांच्या रांगा पहायला मिळाल्या. दरवर्षी चंद्रशेखर चौक येथील मोठ्या मारुती मंदिरापासून निघणारा रथ हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. यावेळी मारुतीच्या रथासोबत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ढोल ताशा पथके, मावळ, उंट, घोडे, मैदानी व साहसी खेळ पहायला मिळाले. यावेळी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी व शरबतचे वाटप करण्यात आले.