Breaking News

शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

संगमनेर : छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व शिक्षण प्रसारक संस्थेचे संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर महाविद्यालयात ‘'निसर्ग उर्जेचा वापर व पर्यावरणाचे संरक्षण यात शाळा व्यवस्थापन व शिक्षकांचा सहभाग’ या विषयावर बुधवारी {दि. ४} रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल यांनी दिली. विद्यालयातील शिक्षक तसेच मुख्याध्यापक हे या उर्जा स्त्रोतांविषयी विद्यार्थी, पालकांना चांगले प्रबोधन करु शकतात. त्याद्वारे निसर्गउर्जेचा वापर वाढेल व पर्यावरणाचे संरक्षण होईल, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.