Breaking News

‘प्रहार’च्या पाठपुराव्याला यश


अहमदनगर : येथील प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नगर-जामखेड रोडवरील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले. यासाठी यासाठी प्रहार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी व संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे, मेजर विनोद राजपूत, अमोल कातोरे, प्रकाश बेरड, महेश पठारे, साधना गुगळे, सत्यवान शिंदे, कुशल घुले, दिपक गुगळे, राजीव पठारे, सागर बनकर, शरद डोंगरे, गणेश माने, मोहंम्मद पठाण, सुनील कोतकर, इंद्रजीत काळे आदी उपस्थित होते.