Breaking News

प्रवरा’च्या नळेंना जिजाऊ सन्मान पुरस्कार प्रदान


प्रवरानगर - जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ मुंबईच्यावतीने मराठी भाषादिनाचे औचित्य साधून सामाजिक, पत्रकारिता, सहकार व कला क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख व्यक्तींना ‘आदर्श शिवसन्मान पुरस्कार व राजमाता जिजाऊ सन्मान’च्या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यात प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या शिक्षिका अनिता नळे यांना जिजाऊ सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नळे या शिवव्याखात्या असून कोपर्डीसारख्या घटना पुन्हा घडू नये, म्हणून त्यांनी युवतींचे सबलीकरण व सक्षमीकरणचे मोठे काम उभे केले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन शिवचरित्र, जिजाऊ चरित्र, युवती सबलीकरण विषयावर त्या व्याख्यानाचे कार्यक्रम करीत आहेत. नरेश राऊत फाउंडेशन चा 'स्त्री अस्मिता' या सारखे पुरस्कार देऊन ठरविण्यात आले होते. अनिता नळे यांना ‘जिजाऊ सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल राज्यातील चाहत्यांकडून अभिनंदन व कौतूक व्यक्त होत आहे.