Breaking News

जिल्‍हा बाल संरक्षण कक्षासाठी पदभरती

अहमदनगर दि. 18- जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी अहमदनगर या कार्यालयांतर्गत असलेले जिल्‍हा बाल संरक्षण कक्ष कार्यरत आहे. या कक्षात पदभरती करावयाची आहे. त्‍यादृष्‍टीने दिनांक 13 ते 19 एप्रिल, या कालावधीत http://mahatenders.gov.in या संकेतस्‍थळावर ई निविदा प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा महिला व बाल विकास कार्यालय, सर्जेपूरा, अहमदनगर ( दूनध्‍वनी क्र. 0241-2431171) येथे संपर्क साधावा, असे जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती विजयमाला माने यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.