Breaking News

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या खास शूटरला अटक !


नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आणखी एका शार्प शूटरला विशेष पथकाने अटक के ली आहे. हा शुटर, यूपी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांची हत्या करणार होता. रिजवी यांना मारण्याची सुपारी डी कंपनीने दिली होती. अटक करण्यात आलेल्या शुटरचे नाव मुजिर असे आहे. पो लिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर करून 10 दिवसांच्या रिमांडमध्ये घेतले आहे. आता रिमांडमध्ये त्याच्याकडून अनेक गोष्टींचा आणि गुपितांचा खुलासा होण्याची शक्यता आहे. पुलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी यापूर्वीच विशेष पथकाने चार जणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून मुजिरचे नाव समोर आले आहे. तो स्तवः एक शूटर आहे. आणि त्याच्या विरोधात यूपीमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.