Breaking News

भारत-पाकदरम्यान डीजीएमओ पातळीवर चर्चा


नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन (डीजीएमओ) स्तरावर एक बैठक झाली. ही बैठक, लेफ्टनंट जनरल अनिल चौहान आणि पाकिस्तानातील त्यांचे समकक्ष यांच्यात पार पडली. काश्मीर खोर्‍यातील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा भारत सामना क रत आहे. दहशतवादाला खतपाणी न घालण्याची मागणी भारताने या बैठकीत केली. पाकिस्तानच्या विनंतीवरून ही चर्चा काल सायंकाळी 6.30 वाजता करण्यात आली. यात, पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या सुरक्षारक्षक दलावर सीमेपलिकडून गोळीबार केल्याचा आरोप भारतीय लष्क राने आपल्या निवेदनात केला आहे. याला उत्तर देताना, जनरल चौहान यांनी पाकिस्तानी समकक्षांना जबरदस्त फटकारले आहे.