Breaking News

सलमानला पाच वर्षांची शिक्षा अभिनेता सैफ अली खान, नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे यांची निर्दोष मुक्तता

जोधपूर : बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने अभिनेता सलमान खानला पाच वर्षांचा तुरूंगवास व 10 हजार रूपयांच्या दंडाखी शिक्षा सुनावली. तर या प्रक रणातील अन्य आरोपी अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे यांची निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, सलमानची तुरुंगवारी टाळण्यासाठी वकिलांची फौज न्यायालयात सज्ज आहे. त्यामुळे जामिनासाठी सेशन कोर्टात अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोन काळविटांची शिकार केल्याचा पाच जणांवर आरोप होता. जोधपूरजवळील कांकणी गावात 1998 मध्ये ही घटना घडली होती. वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. ‘हम साथ-साथ है’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी संपूर्ण टीम जोधपूरला गेली होती. त्यावेळी 1 आणि 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्री कांकणी गावाच्या हद्दीत दोन काळविटांची शिकार करण्यात आली. मध्यरात्री गोळीबाराच्या आवाजानंतर ग्रामस्थांना जाग आली. आणि त्यांनी अभिनेत्यांच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. अभिनेता सलमान खान याच्यावर काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे. तर अभिनेता सैफ अली खान, अ भिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे, सहाय्यक दुष्यंत सिंह, दिनेश गवारे यांच्यावर सलमानला शिकारीसाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप आहे.