सामाजिक कार्याबद्दल अनासपुरे यांचा तिरंगा ध्वज देवून माजी सैनिकांनी केला गौरव
महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य उभे करणारे मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने तीरंगा ध्वज देवून गौरव करण्यात आला.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, खजिनदार भाऊसाहेब करपे, सचिव जगन्नाथ जावळे, सहसचिव निवृत्ती भाबड, संभाजी वांढेकर, दिगंबर शेळके, विश्वस्त संतोष मगर, विठ्ठल लगड, सचिन भुसारी, उद्धवराव थोटे, म्हातारदेव ठोंबरे, सुनिल गुंजाळ, अॅड.मयुर डोके, काकडे, संजय अकोलकर, रामकृष्ण काकडे आदि उपस्थित होते.
प्रास्ताविकात सचिव जगन्नाथ जावळे यांनी देश रक्षणाचे कर्तव्य पार पाडल्यानंतर सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक समाजाच्या विकासासाठी आपल्या पेन्शनमधील वर्गणीतून सामाजिक उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली. तसेच फाऊंडेशनने राबविलेल्या कार्याचा आढावा घेणार्या व भावी कार्याची माहिती असलेली संकल्पसिध्दी पुस्तिका अनासपुरे यांना भेट देण्यात आली. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शहिद परिवारांचे कुटुंबीय व माजी सैनिकांसाठी सहकार्य करण्याची मागणी अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी केली. मकरंद अनासपुरे यांनी सिमेवर शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना नाम फाऊंडेशनच्या वतीने अडीच लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जात असल्याचे सांगितले. तसेच जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांनी पेन्शनच्या रकमेतून उभे केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. आभार भाऊसाहेब करपे यांनी मानले.