श्रीरामपूर शहरातील जॉगिंग ट्रॅकची दुर्दशा
श्रीरामपूर शहरात ठिकठिकाणी काही वर्षांपूर्वी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आले होते. शहरातील बहुतांश लोक या ट्रॅकवर सकाळ संध्यकाळ फिरण्यासाठी येतात तसेच या ठिकाणी लोकांना व्यायाम करण्यासाठी अद्ययावत असे व्यायामाचे साहित्यही बसविण्यात आले आहे. सध्या या ट्रॅकची अत्यंत दुरवस्था झाली असून ट्रॅकलगतच्या झाडांची नीट निगा राखली जात नाही. काही झाडे वाळून गेली आहेत तर काही अस्ताव्यस्त वाढली आहेत.व्यायामाच्या साहित्यही तुटले आहे. काही चोरी गेले आहे. ट्रॅकची स्वछता ठेवण्यासाठी पालिकेने ठेकेदार ठेवले आहे.
चोथानी हॉस्पिटल ते नॉर्दन ब्रँच पर्यतच्या ट्रॅकची अशीच दुर्दशा झाली असून ट्रॅकलगतची झाडे पाण्याअभावी वाळून गेली आहेत. गवत वाढले आहे. ट्रकलगत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. व्यायामाचे साहित्यही तुटले आहे. सरस्वती कॉलनी ते भळगट हॉस्पिटल वरच्या ट्रॅकचीही अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तेथील ट्रॅकलगतची झाडे पाण्याअभावी सुकून गेली आहेत. थत्ते ग्राउंड भोवतीही चारही बाजूने माती-मुरमाचा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकलगतचे झाडेही पाण्याअभावी सुकून नष्ट झाली आहेत..ट्रॅक वर बारीक चिकन मातीची आवश्यकता आहे. ठिकठिकाणी मोठे मोठे खडे असल्यामुळे नागरिकांना पायी चालण्यास त्रास होत आहे. या ट्रॅक ट्रकची स्वच्छता राखून सुशिभिकरण करणे आवश्यक आहे.