Breaking News

गणित विषयाच्या विद्यार्थ्यांची गरुड भरारी: गवांदे

संगमनेर: दि. ७ जानेवारी २०१८ रोजी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई व एस.पी. कॉलेज पुणे यांचे संयुक्त विद्यमाने स.म.भा.सं. थोरात महाविद्यालयाच्या गणित विभागात राष्टीय पातळीवरील “Madhava Mathematics Competition “ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच या स्पर्धेचा निकाल लागला. यात एकूण १४ विद्यार्थ्यानी मेरीटमध्ये येऊन एकूण १११०० रुपयांची रोख पारितोषिके मिळविली. मोरे माधुरी अनिल या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांकाचे १५०० रुपयाचे रोख पारितोषिक मिळाले .तसेच थोरात जॉय रमेश ,वर्पे मयुरी संपत  व वाघमारे गायत्री अनिल या विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांकाचे प्रत्येकी १००० रुपयाचे रोख पारितोषिक मिळाले. आठ विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांकाचे प्रत्येकी ७५० रुपयाचे रोख पारितोषिक मिळाले आणि दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३०० रुपयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले .या कार्यक्रमप्रसंगी स.ब.वि.प्र. समाज संस्थेचे रजिस्ट्रार मा.श्री बाबुराव गवांदे यांनी आपल्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येहि गणितासारख्या अवघड विषयाचे शिवधनुष्य पेलण्याची क्षमता आहे व निकालामुळे विद्यार्थ्यांना गणिताचा अभ्यास करण्यास खूप प्रेरणा मिळेल असे गौरवोद्गार काढले. संस्थेचे अध्यक्ष आ. डॉ. सुधीर तांबे व सचिव चंद्रकांत कडलग यांनी यशस्वी मुलांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रा. मिलिंद सकळकळे ,प्रा.सतीश कडलग व प्रा.निलेश बलसाणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्रशासकीय स्ट|फ बरोबर सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिनकर पवार यांनी केले.