Breaking News

बहुजननामा - जात-वर्गांतची सम्यकक्रांती अंतिम टप्प्यात?

आज ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये ख्रिस्ती धर्मगुरू फ्रान्सिस पोप यांच्या संदर्भातील एक बातमी वाचली आणि मला माझे मित्र फ्रान्सिस वाघमारे यांची आठवण झाली. लगेच फोन लावला. तासभर चर्चा झाली. पोप यांनी एका फार्मल मुलाखतीत सांगितले की, नरक अस्तित्वात नाही. मुलाखत छापून येताच रोमच्या धर्मपीठाने ती मुलाखतच खोटी ठरवली. आमच्या फ्रान्सिसचं म्हणणं हे की आताचे पोप हे खूपच पुरोगामी आहेत. नास्तिकांनाही स्वर्ग मिळू शकतो, असे पोप म्हणतात. अलिकडे प्रोटेस्टंट हे प्रतिगामी व कॅथॉलिकहे पुरोगामी होत चालले आहेत, असेही फ्रान्सिसचं प्रामाणिक म्हणणं आहे. पण हे असे ‘बदलणे’ एकाएकी होते काय? अचानक तर शक्य नाही. या सर्वधार्मिक व भ्रामक कल्पना लोकांमध्ये रूजल्या होत्या. प्रबोधन युग अवतरले आणी लोकांच्या मनात पुरोगामी विचार घर करू लागलेत. अर्थात पुरोगामी विचारांचे फायदेही प्रत्यक्ष विज्ञान युगाच्या रूपाने दिसायला लागलेत. त्यामुळे युरोपात महाप्रबोधनाची चळवळ वेगाने पसरली व चर्चची राज्य-सत्ता कोसळली. मात्र धर्म सत्ता कॅथॉलिक पंथाच्या रूपाने जीवंत राहीली. 

नवीन काही लिहायचे असेल तर दोन पदार्थांची गरज असते. एक म्हणजे लिहिण्याची पाटी व दुसरे म्हणजे काळाची गरज. काळाची गरज असेल तर पाटीवर नवे काही लिहिण्याची प्रेरणा मिळते. पाटी कोरी असेल तर, सहजपणे लिहिण्याची प्रक्रिया पूर्ण होते. मात्र जर पाटीवर आधीच काही लिहिलेले असेल तर मात्र ते पुसण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. युरोपातील महाप्रबोधनाच्या चळवळीनं अनेक बळी घेतले आहेत. भारतात तर ही परंपराच आहे पाच हजार वर्षांची!
पोपचाच मुद्दापुढे सरकत सरकत मोदींवर येऊन पोहोचला. पोपसारखा एक धर्मगुरू जर पुरोगामी विचार मांडू शकतो तर मोदी पुरोगामी बनून काही चांगले का करीत नाहीत? यात एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला जात नाही. एखादी व्यक्ती प्रधानमंत्री पदासारख्या मोक्याच्या जागेवर बसल्यानंतर ती व्यक्ती राहात नाहीतर एका विशिष्ट शक्तीचं प्र तिक बनते. मोदी हे ब्राह्मणी छावणीचे एक प्रतिक आहेत. त्यामुळे व्यक्ती म्हणून मोदीने ‘पुरोगामी’ बनून काही चांगले निर्णय घेणे शक्यच नाही. आणी समजा काही चांगले निर्णय घेतलेही तरी ते निर्णय राबविणारी प्रशासकीय यंत्रणा जर तुमची वर्ग-शत्रू अथवा जात - शत्रू असेल तर ते चांगले असूनही वाइट पद्धतीनेच राबविले जाणार! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कॅडच्या चर्चेत याच शब्दात संविधानाच्या अंमलबजावणीबाबत म्हटले होते कि, जे आज तंतोतंत खरे ठरत आहे.
दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की, ब्राह्मणी छावणी कट्टर ब्राह्मणवादी व जातीयवादी असतांना तीने एका शूद्राला म्हणजे मोदिंना एवढ्यामोठ्या मुख्यपदावर म्हणजे प्रधानमंत्रीपदावर का बसविले? आता हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात शिरावे लागेल. चाणक्याने बौद्ध राजानंद याच्याविरोधात प्रतिक्रांती केली. षडयंत्राने राज्यसत्ता एका रात्रीत उलथून टाकता येते, लोकांच्या मनावर प्रभाव गाजविनारे विचार बदलविणे एक प्रदिर्घ चळवळ असते. ब्राह्मणी छावणीच्या चाणक्याने जरी राज्य प्रतिक्रांती के ली तरी त्याने ब्राह्मणाला राजा नाही बनविले. शूद्र चंद्रगुप्ताला केले. चाणक्याने त्याचे नाव घेऊन राज्यात शूद्र विरोधी कारवाया सुरू केल्या. त्याची झळ खुद्द चंद्रगुप्तालाही बसत होतीच. चाणक्य हा चंद्रगुप्ताला ‘वृषभ’ संबोधत होता. राजा बनूनही तो चाण्यक्याच्या दृष्टीने शूद्रच होता. चाणक्याच्या ब्राह्मणी छळाला कंटाळून राजा चंद्रगुप्ताने शेवटी जैन धर्म स्वीकारून बंड पुकारले. जसे शिवाजी राजाने ब्राह्मण नोकरदारांच्या छळाला कंटाळून शाक्तधर्म स्वीकारला. पण हे कशामुळे शक्य झाले? प्रस्थापित व्यवस्थेचा भाग बनून जेव्हा सर्वोच्चपदावरील एखादी व्यक्ती बंड पुकारते, तेव्हा तीच्या डोळ्यासमोर भक्कम व सुरक्षित पर्याय उभा असावा लागतो. चंद्रगुप्ताच्यासमोर जैनधर्माचा भक्कम पर्याय त्या काळी होता. शिवरायांच्यासमोर शाक्त धर्माचे पीठ होते व संत ज्ञानेश्‍वरासमोर मजबूत अशा नाथ धर्माचा पर्याय होता.
काय असा पर्याय मोदींसमोर आहे? केवळ पर्याय असून चालत नाही. त्याचा क्रांतिकारकपद्धतीने उपयोग करून शत्रूपक्षावर मातही करता आली पाहिजे, अन्यथा बंडखोर राजा हुतात्मा होतो. व्हि.पी. सिंगांसमोर ओबीसी व्होट बँकेचा मोठा पर्याय होता, म्हणून त्यांनी मंडल आयोगाच्या अंशतः अंमलबजावणीला सुरूवात करून बंडाचे निशाण फडका विले, मात्र सिंग हे फुले-आंबेडकरवादी नसल्याने त्यांना ब्राह्मणी छावणीचा सांस्कृतिक प्रतिहल्ला पराभुत करून गेला. त्या वेळचे तमाम क्रांतीकारक म्हणविणारे फुले-आंबेडक रवादी, मार्क्सवादी, समाजवादीयांनी ‘’कामचुकारपणा’’ केल्यामुळे व्हि. पी. सिंगांना राजकिय हौतात्म्य पत्करावे लागले. समाजवाद-मार्क्सवादासारखे शास्त्रशूद्ध क्रांतीचे हत्यार ब्राह्मणांच्या जाणव्याला बांधलेले असल्याने जातीअंतक क्रांतीचा अजेंडात्यांच्या जाहीरनाम्यांच्या पोथ्यांमध्ये सापडणे अशक्यच! आणी जाती अंतकक्रांतीचे तत्वज्ञान आमच्या रक्त ातच आहे’, असे सांगणारे आमचे फुले-आंबेडकरवादी ‘’जात्योन्नती’’ वर समाधान मानणारे असल्याने ऐन मोक्याच्यावेळी कामचुकारपणा करण्यात तरबेज आहेत.
‘शत्रूचा ‘वीकपॉईंट’ हा आपला सामर्थ्य - बिंदू असतो’, हे कोणत्याही युद्धाचे साधे तंत्र असते. ब्राह्मण + क्षत्रिय + वैश्यांच्या ब्राह्मणी छावणीला प्रधानमंत्रीसारखे मोक्याचे व मार्‍याचे पद स्वतःहून एका शुद्राकडे द्यावे लागले, याचा अर्थ ब्राह्मणी छावणी अत्यंत कमजोर होती. तीचा हाच वीक पॉईंट पकडून त्याला आपला सामर्थ्य बिंदू बनविता आला असता. मोदींनी 2014 च्या निवडणूकांमध्ये प्रचार करतांना जाहीर सभेत आपली जात सांगून मते मागीतली आहेत. मै ओबीसी, मै पिछडा असे ओरडून निवडणूक जिंकली आहे. कारण 2014 पर्यंत या देशाचे राजकारण ओबीसी केंद्रित झालेले होते, हे ओळखण्याची पात्रता फक्त ब्राह्मणातच आहे, कारण त्यांच्याकडे आहे ‘प्रतिक्रांतीचे शास्त्रशूद्ध ब्राह्मणी तत्त्वज्ञान, जे धोरण म्हणून कडकआहे व डावपेंच म्हणून लवचिक!
मित्रांनो, अजूनही संधी गेली नाही. शूद्र चंद्रगुप्ताला राजा बनविल्यानंतर चाणक्याने ज्याप्रमाणे त्याचे नांव वापरून शूद्रविरोधी धोरणे राबविलीत, त्याचप्रमाणे ओबीसी प्रधानमंत्री बनविल्यानंतर ब्राह्मणी प्रशासन ओबीसींविरोधी शासन आदेश काढीत आहेत, त्यांचे आरक्षण खतम करीत आहेत, न्यायालये दलित - ओबीसीविरोधात निकाल देत आहेत. आजमोदींची अवस्था चंद्रगुप्त - शिवाजी राजेंसारखी झाली असणारच! पण बंड करण्यासाठी समोर सुरक्षित पर्यायही हवा! .... तो सुरक्षित पर्याय निर्माण करून देण्याची ऐ तिहासिक जबाबदारी जात्यंतक - वर्गांत म्हणविणार्‍या क्रांतिकारक राजकीय पक्षांची आहे. ब्राह्मणी छावणीचा सर्वात मोठा वीक पॉईंट ओबीसी समाज घटक आहे. त्याचे ओबीसी जनगणनेसारखे ईश्श्यु घेऊन राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले तर, मोदी सुरक्षित बंडखोरी करून ब्राह्मणी छावणीला लाथ मारू शकतात. भाजप - काँग्रेससारख्या राष्ट्रीय म्हणविणार्‍या ब्राह्मणी छावणीच्या पक्षांना कमजोर करूनच आपण जाती- वर्गांत क्रांती करू शकतो. व्हि.पी. सिंगांनी काँग्रेसला लाथ मारून ती कमजोर केली व परिणामी मंडलच्या युद्धाला आपण हात घालू शकलो. त्याची पुनर्रावृत्ती करून मोदी भाजपाला कमजोर करू शकतात. त्यामुळे आपल्याला जात - वर्गांतच्या पुढच्या मोठ्या युद्धाला हात घालता येईल. आज फार मोठी संधी चालून आली आहे. ती हुकली तर 2019 पासून पेशवाईच्या प्रतिक्रांतिचा अंतिम टप्पा सुरू होत आहे, तो शेवटास गेला तर, आपल्यापुढच्या सर्व पिढ्या गळ्यात मडके व गांडीला झाडू बांधून फिरतांना दिसतील एवढे मात्र निश्‍चित!
श्रावणदेवरे, 
मोबाईल- 88 301 27 270