Breaking News

तब्बल 6 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या सभागृहाची दूरावस्था


तब्बल 6 कोटी रुपये खर्च करून बांधलेले सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक व वातानुकूलित खा. गोविंदराव आदिक सभागृह ही भव्य दिव्य वास्तू धूळखात पडून असून सध्या सभागृहलगतच्या परिसरात रात्री मद्यपींच्या ’सभा’ चांगल्या रंगत आहेत. नाट्यमंदिरालगतच्या परिसरात दारूच्या व पाण्याच्या बाटल्या ठिकठिकाणी पडलेल्या आहेत. अवघ्या वर्षभरापूर्वीच वास्तुपूजन झालेल्या दिमाखदार व देखण्या अशा नाट्यमंदिराची देखभाल न ठेवल्यामुळे दुरावस्था झाली आहे. तब्बल 6 कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक, एअरकूल व सर्व सुविधायुक्त असलेल्या भव्य दिव्य वास्तूचे पूजन 11 ऑक्टोबर 2016 रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले होते. पालिकेच्या दुर्लक्षतेमुळे 6 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नाट्यमंदिराची अत्यंत दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या , गुटख्याच्या पुड्या , पाण्याच्या बाटल्या, पत्ते अस्तव्यस्त पडलेले आहेत. पालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाचे नाट्यमंदिरात रात्री चालणार्‍या अवैध धंद्यांकडे लक्ष नसल्याने बिनदिक्कतपणे अवैध धंदे या वास्तूलगतच्या परिसरात चालत आहेत. कवड्या, पत्त्यांचे डावही येथे चांगले रंगत आहेत. झाडाझुडपांमध्ये दारूच्या बाटल्या ठिकठिकाणी पडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी पत्ते, गुटख्याच्या पुड्या पडलेल्या असून पत्त्यांचे डावही येथे चांगले रंगत आहेत. गुटखा खाऊन ठिकठिकाणी नाट्यगृहाच्या परिसरात पिचकार्‍या मारलेल्या आहेत. सभागृहासमोर सर्वत्र गवत वाढले असून पाण्याअभावी झाडे सुकून गेली आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या वास्तूमध्ये अवैध धंदे सुरक्षितपणे चालू आहेत. पालिकेच्या दुर्लक्षतेमुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या अत्याधुनिक अशा भव्य दिव्य नाट्यगृह धूळखात पडून अवैध धंद्यांचे सभागृह बनले आहे.