Breaking News

वाळूसह मुरूमाचे बेकायदेशीर उपसा करणारांवर कारवाई

श्रीगोंदा / प्रतिनिधी । तालुक्यात वाळू व मुरुमाचे बेकायदेशीर ऊत्खनन करून तस्करी करणार्‍या सुमारे 24 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तस्करांना अटक वारंटबरोबरच एकून 1 कोटी 59 लाख 80 हजार आठशे चाळीस इतक्या दंडाची नोटिसही देण्यात आली. तहसिलदार मंहेद्र माळी यांच्या धडक कार्यवाहीमुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. श्रीगोंदा तालुका नदीने वेढल्यामुळे तस्करी थाबवणे अवघड आहे. नदिपात्रामध्ये जाणेसाठी रस्तेही अवघड आहेत. महसूलचे पथक कोणतेही बाजुने गेले तरीही खबरे आपले काम चोखपणे बजावताना दिसतात. त्याचा परिणाम असा होतो की, महसूल पथकाला रिकामे परतावे लागते. असे अनेक अनुभव तहसिलदार माळी यांना आल्यामुळे स्टॉक पंचनामे करणेवर जोर देत धडक कारवाई केली. अटक वारंट मध्ये सांगवी दुमाला येथील राजकीय वरदहस्त असणारे तस्कर जास्त आहेत. या चोवीस पैकी एक महिला नगरसेवकांच्या पतीचे नाव असल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. वाळू तस्कारवर ठोस कारवाई सुरू राहिल्यास त्यावर आळा बसेल अशी नागरिकांमध्ये कुजबूज सुरू आहे. तहसीलदार माळी यांचे धडक कारवाईचे लोकांनी स्वागत केले आहे.