मक्का मशीद स्फोट प्रकरण : स्वामी असीमानंदांसह 5 आरोपींची निर्दोष सुटका
एनआयएच्या नामपल्ली येथील विशेष न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी निकाल घोषीत करण्यात आला. या प्रकरणी 10 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल क रण्यात आले होते. त्यापैकी पाच आरोपींविरोधी खटल्याचा आज निर्णय देण्यात आला. पुराव्याअभावी सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे. एनआयए विशेष न्यायालयाच्या निर्णयावर असामाधान व्यक्त करत एमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी एनआयए तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एनआयएने 2011मध्ये सीबीआयकडून हे प्रकरण स्वतः कडे घेतले होते. या प्रकरणी 10 जणांवर आरोप दाखल करण्यात आले होते. किंबहुना यापैकी पाच जणांना अटक करण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध खटला चालविण्यात आला. पाच आरोपींमध्ये देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, स्वामी असीमानंद, भरत मोहनलाल रतेश्वर व राजेंद्र चौधरी यांचा समावेश होता. इतर दोन आरोपी संदीप डांगे व रामचंद्र कलसंग्रा फरार होते. तर सुनील जोशी या मध्य प्रदेशमधील आरोपीची तपासादरम्यान हत्या करण्यात आली होती. हैदराबादमधील ऐतिहासिक मक्का मशिदीतील बा ॅम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने अखेर 11 वर्षांनंतर निकाल दिला आहे.