Breaking News

पुलवामा चकमकीत 2 जवान शहीद एका दहशतवाद्यांचा खात्मा; पाकिस्तानचे तीन बंकर उदध्वस्त

पुलवामा - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागातील लाम गावात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे. यात सैन्यदलाचा जवान आणि पोलीस अधिकारी असे 2 जण शहीद झाले आहेत. या चकमकीत एका आतंकवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. मंगळवारी सकाळी येथील लाम गावात बंदुकीच्या गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर सुरक्षा दलाला पाचारण करण्यात आले होते. पाकिस्तानी सैन्याने सोमवारी पूंछ भागातील काश्मीर घाटीमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर मंगळवारी ही घटना घडली.


दरम्यान, नियंत्रण रेषेवर सातत्याने कुरापती काढणा़र्‍या पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराने आज मोठी कारवाई केली आहे. राजौरी आणि पुंछ परिसरात भारतीय लष्काराने पाकिस्तानी सैनिकांकडून होणा़र्‍या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे तीन बंकर उदध्वस्त करण्यात आले असून, पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले आहेत.भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईत तीन बंकरही उद्धवस्त झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील देवा गावात सर्वात जास्त नुकसान झाले आहे.जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिह्यात पाकिस्तानकडून गेल्या तीन दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत होते. त्यामुळे काल भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. भारतच्या या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानी सैन्याकडून होणारे हल्ले सध्या तरी थांबले आहेत.