Breaking News

तरुण तेजपाल लैंगिक अत्याचारप्रकरणी ९ मे रोजी सुनावणी


सर्वोच्च न्यायालयात तहलका पत्रिकेचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारप्रकरणी सुनावणी ९ मे रोजी होणार आहे. न्यायमूर्ती अर्जन कुमार सिकरी आणि न्या. अशोक भूषण यांच्या पीठाने ही तारीख घोषित केली. गेल्या ९ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने तेजपाल यांच्याविरुद्ध सुरू असलेली सुनावणी रोखण्यासाठी नकार दिला होता. गोव्यातील कनिष्ठ कोर्टाने एक वर्षात सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. लैंगिक अत्याचार व इतर आरोप मागे घ्यावेत, असे अपील तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात केले होते.