मराठा आरक्षणाचे संदर्भात जन सुनावणी 2 मे ला
मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात विभागावर जन सुनावणी घेऊन व्यक्ती, संघटना व सामाजिक संस्थेमार्फत माहिती संकलीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदनगर महसूल जिल्हयामधील ज्या व्यक्ती, संस्था, संघटना यांना मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणा संबंधी आयोगासमोर निवेदन सादर करावयाची आहे किंवा आपले म्हणणे मांडावयाचे आहे अशा व्यक्ती संस्था, संघटना यांनी लेखी पुराव्यासह व ऐतिहासिक दस्तऐवजा माहितीसह दिनांक 2 मे 2018 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथील सभागृहात जनसुनावणीचे वेळी आयोगासमोर सादर करावीत असे जिल्हा समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.