Breaking News

विमान कोसळून 250 जणांचा मृत्यू

अल्जेरिया : अल्जेरियाची राजधानी अल्जियर्समध्ये एक लष्कराचं विमान कोसळलंय. या दुर्घटनेत 250 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला. लष्कराच्या विमानाने बोफारिक हवाईतळावरून उड्डाण भरल्यानंतर काही तासात संपर्क तुटला आणि विमानाला अपघात झाला. स्थानिक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 250 पेक्षा जास्त लोक ांचा मृत्यू झाला. इल्युशिन इल-76 या विमानाला हा अपघात झालाय. या विमानात मोठ्या संख्येनं सैनिक होते. हे विमान बेछर शहराजवळ कोसळलंय. तर स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार मृतांची संख्या 257 वर पोहोचली आहे.