Breaking News

125 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर हेरॉईनचा साठा जप्त केला. या कारवाईत आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या एका टोळीतील चार जणांना अटक क रण्यत आली आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत तब्बल 125 कोटी रुपये एवढी असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले आहे. अटक करण्यात आलेल्या चार जणांपैकी, दोन जण नायजेरिया तर दोन जण अफगाणिस्तानचे नागरिक आहेत, असे विशेष पथकाचे पोलीस उपायुक्त पी. एस. कुशवाह यांनी सांगिले. अटक करण्यत आलेल्या या चार जणांकडून तब्बल 29 किलो चांगल्या प्रतिचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याची किंमत 125 कोटी रुपये एवढी आहे.