कृषी स्वावलंबन योजनेंतर्गंत विहिरीसाठी 1 एकराची अट शिथिल करण्याचा विचार - राज्यमंत्री दिलीप कांबळे
सामाजिक न्याय विभागाकडील योजनाचा आढावा घेण्यासाठी सर्कीट हाऊस येथे आयोजित केलेल्या बैठकीत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे बोलत होते. बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, तहसीलदार सुनील शेरखाने तसेच समाज कल्याण विभागाचे निरीक्षक संजय पवार उपस्थित होते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गंत विहीरीसाठी सद्या लाभार्थीची किमान 1 एकर क्षेत्राची अट आहे, त्यामुळे 1 एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, ही बाब विचार घेऊन या योजनेसाठी किमान 1 एकर क्षेत्राची असलेली अट शिथील करुन ती अर्धा एकर करण्याचा शासनाचा विचार आहे. मात्र ज्यांचे क्षेत्र 1 एकरापेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेत प्राधान्य राहिल, असेही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी स्पष्ट केले.