Breaking News

रावेरला हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीस सुरुवात


जळगाव, दि. 07, मार्च - रावेर तालुक्यातील शेतक-यांचा हरभरा शासकीय दरात खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी हरभरा शासकीय दरात खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासही सुरुवात झाली. शासनाने प्रति क्विंटल चार हजार 400 रुपये भाव निश्‍चित केला आहे. मंगळवारी खरेदी-विक्री संघात बाजार समिती संचालक पितांबर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी बाजार समिती सचिव गोपाळ महाजन, खरेदी-विक्री संघाचे मॅनेजर विनोद चौधरी, क्लार्क प्रशांत पाटील, नारायण लोणारी, संजय महाजन, योगेश पाटील, भावलाल शिंदे, विजय पाटील, विलास प्रेमचंद आदी शेतकरी उपस्थित होते.