Breaking News

नंदुरबारला कडकडीत बंद; पोस्टर प्रकरणाचे पडसाद

नंदुरबार, दि. 07, मार्च - नंदुरबार शहरात शिवजयंतीनिमित्त अफजलखानाच्या वधाचे फलक शहरातील काही भागांमध्ये लावण्यात आले होते. हे फलक पोलीसांनी सोमवारी उतर विल्याने पोलीस व हिंदू संघटनामध्ये वाद निर्माण झाला. पोलिसांच्या या कावाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवार दि. 6 रोजी नंदुरबार शहर बंदचे आवाहन करुण शहरात सर्वत्र व्यवहार बंद ठेवण्यात आले. या बंदमुळे शहरासह परिसरातील सर्व व्यवहार ठप्प होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरात तिथीनुसार रविवार दि. 4 रोजी शिवजयंती साजरा करण्यासाठी परदेशीपुरा भागात केतन दिलीपसिंग रघुवंशी या राजकीय कार्यक र्त्यांसह काहींनी अफलजखानाचा वध करतांनाचे फलक लावले होते. हे फलक हटविण्यासाठी सोमवार 5 रोजी पोलिसांनी कारवाई केली असता यावेळी वाद निर्माण झाला. पोलीसांनी कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी केतन रघुवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आणि त्यास ताब्यात घेतले. या कारवाईचा विरोध शहरातील राजकीय तसेच हिंदुत्ववादी सामाजिक संघटनांतून करण्यात आला आणि या कारवाई विरोधात मंगळवारी नंदुरबार बंदची हाक देण्यात आली.