Breaking News

भिंगारच्या सदर बाजारचा दूषित पाण्याचा प्रश्‍न मार्गी


भिंगार येथील सदर बाजार परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला होता. छावणी मंडळाचे उपाध्यक्ष मुसद्दीक सय्यद यांनी त्यांच्या विकास निधीतून हा प्रश्न मार्गी लावला. या नवीन पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष पहाणी केली. 

सदर बाजार परिसरात ३५ ते ४० वर्षांपूर्वीची जुनी पाईपलाइन जिर्ण झाल्याने नागरिकांना नळाद्वारे दूषित पाणी येत होते. यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला होता. हे काम अंतिम टप्प्यात आले असता सय्यद यांनी या कामाची पहाणी केली. यावेळी शमीम शेख, सविता साळवे, विमल घाटविसावे, इंदू घोडके, कलावती शिंदे, वच्छला लोंढे, इब्राहिम शेख, मयूर घाटविसावे, इम्रान जहागिरदार, निर्मला कांबळे, वनिता कांबळे आदींसह नागरिक उपस्थित होते. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी सय्यद यांना धन्यवाद दिले.