Breaking News

धडक बेधडक नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे!


बॅकफूटवर गेलेल्या राहुरी तालुक्याच्या विकासासाठी नगरपालिका आणि प्रसाद शुगर कारखान्याच्या माध्यमातून अहोरात्र प्रयत्नशील असलेले नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे हे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत. शहरातील विविध प्रश्‍न सोडवितानाच शेतकरी आंदोलन, पिकविमा प्रश्‍न, शेती पाण्याची समस्या आणि ऊस उत्पादकांचे फुलवलेले जीवन अशा अनेक कामांमुळे राहुरीकरांचे विकासाचे स्वप्न धडक बेधडक असा स्वभाव असलेले नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्याकडून साकारले जाणार आहे, अशी राहुरीकरांची भावना आहे. 

राज्यात थाट मिरविणारा राहुरी तालुका विकास कामांच्या प्रतिक्षेत दिवसेंदिवस पिछाडीवर चालला आहे. बेरोजगार तरूणांना रोजगार नाही, शेतकर्‍यांचा पाण्याचा प्रश्‍न घोंगावतोय, कायदा सुव्यवस्था नसलेले प्रशासन, गुंडगिरी, दडपशाही आणि हे कमी म्हणून की काय, तालुक्यातील रस्ते नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी दळणवळणाचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. संकटात सापडलेल्या सहकारी संस्थांचा जीव गुदमरतोय, निळवंडे कालव्याचा प्रश्‍न, वांबोरी, भागडा चारीचा प्रश्‍न, आदिवासी समाजासह प्रकल्प ग्रस्त व धरणग्रस्तांचा प्रश्‍न भेडसावतोय अशा एक ना अनेक प्रश्‍नांची त्रस्त झालेला राहुरी तालुका विकास कामांबाबत खालच्या क्रमांकावर पोहोचला आहे. दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या शोधात असलेली राहुरीची जनता नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. 

राहुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान होऊन बंद खोलीत बसून हारतुरे घेण्यापेक्षा मतदान करणार्‍या व विकास कामांची अपेक्षा मनात राखणार्‍या सर्वसामान्यापर्यंत ते स्वतःहून पोहोचतात. प्रत्येकाच्या मनातील मत जाणून घेणारा नेता म्हणून नगराध्यक्ष तनपुरे यांचे नेतृत्व तालुकावासियांनी जवळून पाहिले. तेव्हापासूनच राहुरी तालुक्याच्या विकासाची जाण असणारे युवा नेतृत्व म्हणून तनपुरे यांच्याकडे जनसामान्यांना मोठी आस लागलेली आहे. नगराध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या विकास कामांची चुणूक जनतेला दाखवून दिली होती. विरोधकांची बाजू अत्यंत मजबूत असतानाही जे काम सत्ताधार्‍यांना जमले नाही, ते काम संघर्षाच्या बळावर पूर्ण होत असल्याचे दिसू लागले आहे. गेल्या १० वर्षांपासून शेवटची घटिका मोजणार्‍या राहुरी ग्रामिण रूग्णालयाची इमारत दिवसेंदिवस ढासळत असताना सत्ताधार्‍यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.

 विधानसभेत विरोधी गटाकडून ताकद लावल्यानंतर ‘बोलाची भात व बोलाचीच कढी’ अशी अवस्था सत्ताधार्‍यांची दिसून आली. नगराध्यक्ष होण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी ग्रामीण रूग्णालयासमोर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. प्राजक्त तनपुरे यांनी उपोषण हाती घेताच त्याचा पेटलेला वणवा विधानसभेपर्यंत पोहोचला. अखेरीस मंत्रालयातून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी प्राजक्त तनपुरे यांच्याशी संपर्क साधत कोणत्याही परिस्थितीत राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयासाठी निधी देण्याचे मान्य केले. राहुरी शहरातील विकलांग जन्माला आलेल्या तिन्ही मुलांचा सांभाळ करणार्‍या मासरे कुटूंबियांना शहरात कोणीही भोडोत्री घर दिले नाही. आज त्या मासरे कुटूंबियांना भाडोत्रीच नव्हे तर स्वतःचे हक्काचे घर मिळवून देण्याचे काम प्राजक्त तनपुरे यांच्यामुळे झाले. त्यांच्या या कामाची माहिती जनप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी दखल घेतली. आ. कडू यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्याची प्रशंसा करत जेव्हा वाटेल तेव्हा साथ देण्याचे आश्‍वासन दिले. 

अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते पिडितांची भेट घेऊन प्रसिद्धीमाध्यमांसमोर आश्‍वासनांची खैरात करतात. मात्र आपले काम प्रसिद्धीसाठी नव्हे तर सर्वसामान्यांसाठी हे ब्रिद घेऊन काम करणारे तनपुरे यांनी नुकतेच पाथर्डी भागात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवेळी पिडित कुटूंबियांची भेट घेऊन संबंधित मुलीच्या शैक्षणिक व आरोग्याचा सर्व खर्च करण्याचा निर्णय घेतला. कुरणवाडी पाणी योजना लाभार्थी गावांची पाहणी केल्यानंतर महिलांची पाण्यासाठी होत असलेली हेळसांड पाहून तनपुरेंनी तातडीने प्रसाद शुगरच्या माध्यमातून कुरणवाडी पाणी योजनेला बिनव्याजी २५ लाख रूपये उपलब्ध करून दिले. 

राज्य शासनाकडे पाणी पुरवठा योजनेसाठी निधी मिळावा म्हणून गेल्या पाच वर्षांपासून होत असलेला पाठपुरावा तनपुरेंच्या नेतृत्वात मार्गी लागणार आहे. शहरातील शेकडो कुटुंबियांना घरकुल योजनेचा लाभ मिळत असून शहरातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, यासाठी त्यांनी जातीने लक्ष घातले आहे. नगरपालिका प्रशासनामध्ये सत्ताधारी कोण व विरोधक कोण, हे न पाहता केवळ विकास साधायचा आहे, हाच दृष्टीकोन ठेवत नगराध्यक्षपद भूषविताना प्राजक्त तनपुरेंनी सर्व नगरसेवकांना दिलेली समान वागणूक त्यांच्या भावी राजकारणासाठी उपयुक्त ठरणारी आहे.