राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी गुणवत्ता वाढ व्हावी : डॉ. करमाळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिक्षण विकास प्रशासन केंद्र, प्रवरा मेडिकल ट्रष्ट आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहामध्ये ‘शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखा परीक्षण’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अनिरुद्ध देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्रो. चॅन्सलर डॉ. राजेंद्र विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, सिनेट सदस्य अनिल विखे, बाळासाहेब नाईक, ए. एम. भोसले, डॉ. सुलभा देवस्कर, दिनेश नायक, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय . एम. जयराज, फर्गुसन कॉलेजचे डॉ . एम. जी. गोसावी, बिना इनामदार, डॉ. गोयल, डॉ. विद्यासागर, डॉ. हरिभाऊ आहेर, डॉ प्रिया राव. डॉ. प्रदीप दिघे आदींसह अहमदनगर आणि नाशिक विभागातील अधिकारी उपस्थित होते, ‘पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान, ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान’ ’या विद्यापीठ गीताने चर्चासत्राला प्रारंभ झाला. सुरुवातीला सावित्रीबाई फुले, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.