कोपरगाव / प्रतिनिधी - सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या साई गोदा प्रतिबिंब प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून समाजातील उपेक्षित गरजूंना मिष्टान्न भोजन देण्यात आले. शहरातील दत्त पार याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. शिवजयंतीला डिजे लावून त्यावरील गाण्यांवर ओंगळवाणे नाचण्यात शक्ती खर्च करत असलेल्या तरुणाईसाठी या प्रतिष्ठानचा हा आदर्श उपक्रम आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजू आणि गरिबांच्या मुखात चार घास घालण्याच्या या पुण्यदायी कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. कार्याध्यक्ष बालाजी आंबोरे, अध्यक्ष राहुल देवरे, उपाध्यक्ष शिवाजी धनाड, सचिव विशाल शिनगारे, खजिनदार गोविंद कुलकर्णी, शाम गवंडी, कुणाल वाणी, आनंद उदावंत, विक्रांत झावरे, सुनील फंड, विजय नागरे, विजय सोनवणे, बंट्टी ठोळे, सागर हाडा, अरविंद मंडलिक, राजेंद्र कपोते, सनी काळे, चेतन कुक्कर, राहुल देवळालीकर, रविंद्र कुदळे, रितेश सिनगर, वैभव ऊबाळे आदींसह सदस्य उपस्थित होते.
‘साई गोदा’ तर्फे शिवजयंतीनिमित्त मिष्टान्न भोजन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:46
Rating: 5