Breaking News

अधिका-यांच्या बदल्यांमध्ये दुजाभाव होत असल्याचा स्थायी समितीचा आरोप

नवी मुंबई, दि. 10, मार्च - आरोग्य विभागातील अधिका-यांच्या बदल्यांमध्ये दुजाभाव होत असल्याचा आरोप आज स्थायी समितीच्या सदस्यांनी बैठकीत करत प्रशासनाला फैलावर घेतले. एकीक डे रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा पुरविल्या जात नसतांनाच आरोग्य विभागातील अंतर्गत राजकारणामुळे अधिका-यांच्या बदल्या होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. 


मीरा पाटील यांनी धनवंतरी गाडगे यांची जबाबदारी नागरी आरोग्य केंद्र पहाणे हे असून त्या त्या ठिकाणी जात नल्याचा आरोप केला. आरोग्य विभागात कोणाचा समन्वय नसल्याचेही त्या म्हणाल्या. सभापती शुभांगी पाटील यांनी देखील जे अधिकारी 10 वर्षे एकाच ठिकाणी बसले त्यांची बदली होत नाही; मात्र केवळ झुझारे यांचीच बदली का केली, त्यांची देखील बदली करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच जे लोक काम करत नाही त्यांना प्रशासन पाठीशी घालत असून, रुग्णालयात साहित्याचा अभाव आहे. आम्हाला लाज वाटते पालिका रुग्णालयांत साधे खोकल्याचे औषध नाही, तापाच्या गोळ्या नसून डॉक्टर बाहेरून आणण्यासाठी चिठ्ठी लीहून देत आहेत. या संदर्भात वारंवार पुरावे देऊनही प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही, स्थायी समिती बैठकीनंतर शहरातील नागरि आरोग्य केंद्रांचा दौरा घेण्यात यावा व यामध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित अधिका-यांवर प्रशासन काही कारवाई करणार का, असा प्रश्‍न पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर सुरुवातीला काही बोलण्याचे टाळल्यावर अखेर अतिरिक्त आयुक्तांनी कामात कसूर करणार्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. देविदास हांडे-पाटील यांनी झुंझारे यांचा मुख्यालयात काही लोकांना त्रास होत होता, अशी माहिती देत केवळ एकाच अधिका-याची बदली केलेल्याने त्याला आक्षेप घेत अन्य अधिकार्यांच्या बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी केली. नगरसेवक अशोक गावडे यांनी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंझारे यांच्या बदलीवरून प्रशासनाला धारेवर धरले.