Breaking News

निलेश लंकेच्या वाढदिवसाला समर्थकांचे हंग्यात होणार शक्तीप्रदर्शन


पारनेर / दत्तात्रय ठुबे/- तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या शनिवारी सायंकाळी हंग्यात होणारा वाढदिवसाच्या निमित्ताने लंके समर्थक शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत असुन या कार्यक्रमात निलेश लंके काय भुमिका मांडतात ? व काय भाष्य करतात. याकडे शिवसेनेसह काॅग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे गेल्या ३० वर्षांपासून पारनेर तालुक्यातील गावपातळीपासुन ते जिल्हा पातळीवर शिवसेनेच्या माध्यमातून काम करणारा तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी पारनेर येथील झालेल्या प्रकाराबाबत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व पक्षश्रेष्ठीपुढे यांच्या पुढे माफीनामा सादर करूनही तालुकाप्रमुख पदी विकास रोहकले यांची नियुक्ती पक्षाने दैनिक सामना या मुखपत्रातुन जाहिर केली आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील व मुंबई पुणे येथील नोकरी व व्यवसायानिमित्ताने असणारा शिवसैनिकाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे पक्षाला व तालुक्यातील शिवसेना नेत्यांना ताकद दाखविण्यासाठी लंके समर्थकांनी कंबर कसली असुन यानिमित्ताने जय्यत तयारी सुरू केली आहे. जनताजर्नादन व बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत असुन आगामी काळच याचे उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी दिली आहे. समाजासाठी काम करत राहिले तर समाज तुम्हाला डोक्यावर घेतो. त्यानुसार पद असो वा नसो काम करत राहणार असल्याचे तालुका प्रमुख निलेश लंकेनी सांगितले. तर तालुकाप्रमुख निलेश लंके यांची शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदाबाबत पक्षीय पातळीवर जो निर्णय झाला आहे. त्याबाबत आपण अनभिज्ञ असुन तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्यानी कोणत्याही पदाचा राजीनामे देवु नये. असे आवाहन निलेश लंके यांनी केले आहे. तर मी एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणुन तालुक्यात काम करत असुन मी कोणालाही कार्यकर्ता अथवा समर्थक मानत नसुन कुटुंबातील एक घटक म्हणुन मानत आहे. त्यामुळे पक्षाचा जो निर्णय असेल त्यावर तो झाल्यानंतर बोलणे उचित राहिल असेही तालुकाप्रमुख निलेश लंके म्हणाले. तर दुसरीकडे लंके समर्थक १० मार्च रोजी हंगा येथे तालुकाप्रमुख निलेश लंकेचा वाढदिवस असुन पारनेर तालुक्यातील कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहे. त्यामुळे या वाढदिवसाच्या कार्यक्रमात लंके काय भुमिका मांडतात ? अथवा भाष्य करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.