Breaking News

संजय गांधी योजना बैठक संपन्न


संजय गांधी योजनेच्या बैठकीचे आयोजन तहसिल कार्यालयामध्ये संपन्न झाली. यावेळी श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र माळी, संजय गांधी कमीटीचे बाळासाहेब महाडिक, सदस्य रामदास घोडके, बळीराम बोडखे, अरूण जगताप, बाळासो दांगट, मुरलीधर होनराव, विठ्ठल काकडे, एस.बी. ढवळे, कारकूर अव्वल, विकील बहूरे, यांच्या उपस्थितीत पार पडली. तसेच बैठकीमध्ये संजय गांधी योजनेचे 70, श्रावणबाळ योजनेचे 120, तर इंगायो वृद्धापकाळ योजनेचे 15 असे एकूण 290 प्रकरण मंजूर करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेच्या कमिटीमार्फत श्रीगोंदा तालुक्यातील गोरगरीब आणि दारीद्रय रेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, श्रावणबाळ इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी मागील 6 महिन्यात 885 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेचे 20 हजार रूपये प्रती व्यक्ती असे 40 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच श्रीगोंदा तालुक्याचे माजी मंत्री बबन पाचपुते यांचे हस्ते राष्ट्रीय लाभ योजनेचे तहसिल कार्यालय येथे पार पडलेल्या संजय गांधी योजनेच्या बैठकीत 11 कुटूंबियांना प्रत्येकी 20 हजार रूपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.