Breaking News

एकतर्फी प्रेमातून जीवंत जाळले


कर्जत तालुक्याातील कोरेगांव येथील अश्‍विनी कांबळे या युवतीस तिच्या राहत्या घरासमोर एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याचा प्रकार दि. 24 रोजी घडला होता. अश्‍विनीच्या अंगावर दोघांनी रॉकेल टाकून पेटवून पसार झाले होते. पेटलेल्या युवतीस नातेवाईकांनी विझवून सरकारी रूग्णालयात आणले असता, तिला ताबडतोब नगर येथे पुढील उपचारासाठी पाठवले होते. अश्‍विनी ही 85 टक्के भाजलेली होती. उपचारादरम्यान तिचा मुत्यू झाला. मुत्यूपुर्वी पोलीसांना दिलेल्या जबाबात तिने शैलेश बारकू अरसुळ व किशोर छगन अरसूळ या दोघानी मला एकतर्फी प्रेमातून जाळले असल्याचे सांगीतले.आरोपींना अटक होत नाही तोपर्यत मयतचे अंत्यसंस्कार केले जाणार नाही, अशी भूमिका मयताच्या नातेवाईकांनी घेतल्याने पोलीसांनी त्वरीत हालचाली करून रात्री उशीरा आरोपींना अटक केली. या आरोपींना पोलीसांसमोरच नातेवाईकांनी बेदम चोप दिला.