Breaking News

गुजरात विधानसभेत आमदारांमध्ये हाणामारी


गांधीनगर : विधानसभेचे कामकाज सुरू असताना काँग्रेसचे आमदार प्रताप तुधात यांनी भाजपचे आमदार जगदीश पांचाळ यांना माईक उचलून मारहाण केल्याची घटना घडली. सत्ताधारी विरोधकांना बोलू देत नसल्याच्या कारणावरून बुधवारी गुजरात विधानसभेत मोठा गोंधळ उडाला. यादरम्यान ही घटना घडली. टेबलवरील माईक उचलून सभागृहात आमदाराला मारहाण केल्याची घटना गुजरात विधानसभेत पहिल्यांदाच बघायला मिळाली. सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधकांनी बोलू देत नाहीत, असा आरोप करत काँग्रेस आमदारांनी गदारोळ सरू केला. यादरम्यान पांचाळ यांनी माईक उचलून तुधात यांना मारहाण केली. गुजरात विधानसभेत भाजपचे 99 तर काँग्रेसचे 77 आमदार आहेत.