मुंबईतील 72 पोलीस ठाणे अनधिकृत
मुंबई, दि. 08 - काँग्रेसचे आक्रमक आमदार नितेश राणे यांनी अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी पालिकांना संरक्षण देणा-या पोलिसांचे पोलीस ठाणे अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली असून मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांपैकी एक-दोन नव्हे तर तब्बल 72 पोलीस स्टेशन्स अनधिकृत असून या स्टेशन्सकडे स्वत:च्या नावे वीज, पाणी, टेलिफोन्सचे कनेक्शन नसल्याचे उघडकीस आणले आहे.
दिवसेंदिवस मुंबईकरांच्या संरक्षणासाठी जीवाचे रान करून अहोरात्र सेवा देणा-या पोलीस दलाची अवस्था दयनीय होत असून नागरिकांचा गा-हाणी ऐकणा-या पोलिसांची गा-हाणी ऐकायला राज्याच्या गृहखात्यालाही वेळ नसल्याचे आमदार राणे यांनी मिळवलेल्या माहितीतून समोर आले आहे. पोलिसांच्या समस्या कशाप्रकारे सोडवता येतील, यावर गेले चार महिने मी अभ्यास करीत होतो. पोलिसांनाही त्यांचा अधिकार मिळायला हवा, पण त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आवाज उठवणारी संघटना असायला हवी हे वारंवार जाणवत असल्याचे मत आमदार राणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत मांडले.