Breaking News

केपी-सुर्यवंशींच्या गुप्त बैठकीचे फुटेज लोकमंथनच्या हाती


मध्य मुंबई साबांतील चोवीस कोटीच्या अपहाराचा गुन्हा वरळी पोलिस ठाण्यात दाखल होऊ नये म्हणून मर्झबान रोड वरील साबां मंडळाच्या पाचव्या मजल्यावर एक गुप्त बैठक झाली.या बैठकीत मुख्य अतिथी होते अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी आणि कार्यकारी अभियंता किशोर पाटील अर्थात साबांचे केपी.चोवीस कोटी अपहाराची तक्रार दाखल के ली जाऊ नये हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा होता.यातून मधला मार्ग शोधून उपकार्यकारी अभियंता एस.के.पाटील यांना रजा टाकण्याचा सल्ला दिला गेला तर नव्याने रूजू झालेले मध्य मुंबईचे कार्यकारी अभियंता सांगळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले गेले. दि.12 मार्च रोजी दुपारी 11.00 ते 1.00 या दोन तासात झालेल्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज लोक मंथनच्या हाती लागले आहेत.त्यानंतर दुपारी 1.40 वा. आ. चरणभाऊ वाघमारे यांनी या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रीयेसंदर्भातमुख्य अभियंता केडगेष आणि अधिक्षक अभियंता सुर्यवंशी यांना दुरध्वनीवर विचारणा केली असता मिळालेल्या माहीतीवरून खर्‍या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी प्रक्रीयेत खोडा घालून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे तर जे जबाबदार नाहीत किंवा अप्रत्यक्ष ज्यांचा संबंध येऊ शकतो त्यांना बळी देण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष काढण्यास वाव मिळतो.