Breaking News

माजी विद्यार्थी हे ‘संजीवनी’चे हिरे : कोल्हे


कोणत्याही शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी ही त्या संस्थेची अनमोल संपत्ती असते. कारण यामुळे शैक्षणिक संस्थेच्या लौकिकात भर पडत असते. ‘संजीवनी’चे माजी विद्यार्थी आयुष्यातील चढ-उतारांची तमा न बाळगता आत्मविष्वासाच्या बळावर यशस्वी उद्योजक बनले, ही बाब ‘संजीवनी’साठी भूषणवह आहे. खऱ्या अर्थाने हे माजी विद्यार्थी ‘संजीवनी’च्या मुकूटातील हिरे आहेत, असे गौरवोद्गार संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांनी काढले. संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकने वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योजक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा ‘संजीवनी तंत्र उद्योजक ’ पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी कोल्हे बोलत होते. प्राचार्य ए. आर. मिरीकर, प्रा. सुधाकर शेळके, योगेश वाके, मिलींद तारे, प्रा. योगेश जगताप आदी उपस्थित होते. प्रा. शेळके यांनी आभार मानले.