Breaking News

अनापवाडी येथे जॉगिंग ट्रॅक


राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील तरुणांनी मेजर रवि अंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित येत संयुक्त पाणीपुरवठा निभेरे, कानडगाव, तुळापूर या तलावाच्या चारही बाजूंनी काटेरी झुडपांचा नायनाट करत ट्रॅक तयार केला. तलावाच्या चारही बाजूंनी साफसफाई करून दगड लावून मार्किग करण्यात आली. प्रवरा तालीम संघाचे अध्यक्ष पै. अनिल अनाप यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी मेजर रवि अनाप, संदीप अनाप, अविनाश अनाप, केशव शिंदे, वैभव अनाप, ऋषिकेश अनाप, सुनील अनाप, ईश्वर अनाप, वैभव शिंदे, रविंद्र गागरे, दिनेश अनाप, अक्षय अनाप, अंकित अनाप, नवनाथ अनाप आदी उपस्थित होते.