Breaking News

सबुरीने घ्या ; विकास हाती घेतलाय : आ. कोल्हे


विरोधकांकडे केवळ टिकेचा चष्मा आहे. त्यामुळे ते केवळ टीका करीत आहेत. विरोधकांनी चष्मा बदलावा. सबुरीनं घ्यावे. तालुक्याचे सर्व प्रश्न सोडवून दाखवेन, अशी गर्जना आ. स्नेहलता कोल्हे यांनी केली. साडेतीन वर्षांत भाजपासेना युती शासनांकडून मतदारसंघाच्या विकासासाठी कोटयावधी निधी आणून विकास हाती घेतला आहे, असेही त्या म्हणाल्या.

तालुक्यातील धामोरी, रवंदे, येसगांव, खिर्डीगणेश येथे प्रजिमा चार दहेगांव बोलका रस्त्याचे २ कोटी ६३ लाख रूपये खर्चाच्या रस्ता मजबुतीकरण व सुधारणा कामांच्या भूमिपूजन आ. कोल्हे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी संजीवनी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष त्रंबकराव सरोदे यांनी प्रास्तविक केले. सहायक उपअभियंता संजय कोकणे यांनी रस्ते कामाची माहिती दिली. शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष विलास कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दहेगांव बोलका ग्रामपंचायतीच्या सरपंच संगिता सरोदे, उपसरपंच रुक्मिनी आभाळे व पंचक्रोषीतील ग्रामस्थांच्यावतीने आ. कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे पौराहित्य किशोर व मनोज जोशी यांनी केले. याप्रसंगी संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, संचालक फकिरराव बोरनारे भास्करराव भिंगारे, पांडुरंगशास्त्री शिंदे, डाॅ. गुलाबराव वरकड, निवृत्ती बनकर, प्रभाकर ससाणे, बाळासाहेब वक्ते, वैभव गिरमे, सोपानराव देशमुख, माजी प्रतोद केशव भवर, उत्तमराव चरमळ, कैलास संवत्सरकर, वसंतराव देशमुख, विषुपंत क्षीरसागर, माधवराव रांधवणे, बाळासाहेब वल्टे, छन्नुदास वैष्णव, हरिभाउ पवार, सदाशिव वल्टे, साहेबराव बागल, रामदास देशमुख, श्रीधर देशमुख, साहेबराव डोंगरे, नारायण टुपके, माजी सरपंच विठठल बागल, संतोश देशमुख, पंढरीनाथ साळवे, बाळू वल्टे, शहाजी टुपके, शिवलाल साळंके, भिमराज मोकळ, लक्ष्मणराव वल्टे, अंजीराम खटकाळे, संजय जामदार, दिगंबर जाधव, अण्णा खिलारी, विलास देशमुख, गोरख टुपके, अंबादास गव्हाळे, एन. एच. आठशेरे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, दहेगांव ते भोजडे, कासली शिव रस्ता, स्मशानभूमी रस्ता, निघोट व सोनार नाला येथे दगडी साठवण बंधारे व्हावे, अशी मागणी त्र्यंबकराव सरोदे, छन्नुदास वैष्णव, विलास कुलकर्णी, वसंतराव देशमुख आदींनी केली. यावेळी माजी प्रतोद केषव भवर म्हणाले, की जिल्हा परिषद, पंचायत समितीत सत्तांतर होऊनही विरोधकांना टिकेशिवाय काहीही ठोस विकास काम करता आला नाही. यापूर्वी आमदारांची काय कामे झाली व सुरू आहे त्याची जंत्री आपल्याकडे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्र्यंबकराव सरोदे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.