Breaking News

भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम


जैन समाजातील तिर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त जैन समाजाच्यावतीने राहुरी शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती सराफ व्यावसायिक राजेंद्र भनसाळी यांनी दिली.
जैन धर्माचे २४ वे तिर्थंकर भगवान महाविर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली राजाच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व ५९९ मध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते. महाविरांचे कुटूंबीय जैनाचे २३ वे तिर्थंकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते. महाविर यांनी वयाच्या ३० वर्षी श्रामणी दिक्षा घेतली. त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असत. त्यांनी १२ वर्षांपर्यंत मौन पाळले होते. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जन कल्याणासाठी उपदेश देण्यास सुरुवात केली. त्याग, संयम, प्रेम, करुणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. त्यांनी चतुर्विध संघाची स्थापना करुन समता हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले.

यादरम्यान माजी खा. प्रसाद तनपूरे, उपनगराध्यक्षा सुमती सातभाई विविध समाजातील मान्यवरांनी मिरवणूकीचे स्वागत करुन महाविरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.